भुसावळातील सेवानिवृत्ताला लुटले : चौकडी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Retiree robbed in Bhusawal : Four in Jalgaon Crime Branch’s net भुसावळ : शहरातील 47 वर्षीय सेवानिवृत्त बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाल्यानंतर त्यांना वांजोळा रस्त्यावर अडवून लुटण्यात आले होते. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने भुसावळसह कंडारी येथील चौघा तरुणांना अटक केली आहे.प्रमोद कैलास धीवरे (27, अशोक सम्राट नगर, कंडारी), मयूर संजय अंभोरे (22, पंधरा बंगला, भुसावळ), आकाश किशोर किरतकुरे (28, अशोक सम्राट नगर, कंडारी) व हितेंद्र उर्फ किट्टू राजू बोदाला (24, झेडटीएस, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अनिल जाधव, हवालदार कमलाकर बागुल, हवालदार अनिल देशमुख, हवालदार दीपक पाटील, संतोष मायकल, हेमंत पाटील, उमेश गोसावी, चालक राजेंद्र पवार आदींच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपींना अधिक कारवाईसाठी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !