अनोळखी तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह


The body of an unidentified youth was found in a well in Pimpalseem Shivar धरणगाव : पिंपळेसीम शिवारातील विहिरीत एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारयण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी बुधवार, 4 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बुधवारी आढळला मृतदेह
धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम गावातील रहिवासी संतोष पाटील यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे चाळीस वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह बुधवारी 4 जानेवारी रेाजी सकाळी 11 वाजता आढळून आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती संतोष पाटील यांनी धरणगाव पोलीसांना दिली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आला. मयत हा तरूण अंदाजे 40 वर्षीय असल्याचा अंदाज शाासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तवला. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी 2 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !