दुसखेडा शिवारात आरपीएफ जवानावर दोघा चोरट्यांचा चाकू हल्ला : एकाला अटक


Two robbers knife attack on RPF jawan in Duskheda Shiwar : One arrested भुसावळ : भुसावळ विभागात बुधवारी रात्री गस्तीवर असलेल्या अनुजकुमार रीसपालसिंग या जवानाने दुसखेड्याजवळ रेल्वे लाईनीवर इलेक्ट्रीक केबल चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या दोन संशयीतांना हटकताच त्यांनी आरपीएफ अनुजकुमार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री 11.30 वाजता घडली. यामुळे खळबळ उडाली आहे. जवानाने पाठलाग करून एका आरोपीला अटक केली आहे. रवींद्र भाऊलाल सोनवणे (37, रा.उटखेडा, यावल) असे आरोपीचे नाव आहे.

चोरी करताना हटकताच केला हल्ला
बुधवारी रात्री अनुजकुमार रीसपाल सिंग (30) हे दुसखेडा येथे गस्त करीत असतांना रेल्वे लाईनीवर दोन व्यक्ती त्यांना दिसले. यावेळी आरपीएफ याने दोन्ही जणांची चौकशी करीत असतांना दोन्ही जणांनी आरपीएफ यांच्याही हातापायी केली. यावेळी पकडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आरपीएफ अनुजकुमार यांच्यावर हल्लेखोरांनी त्यांच्या जवळील धारदार शस्त्राने जबर हल्ला केला. यात आरपीएफ जखमी झाला. याची संधी साधत दोन्ही संशयीत पसार झाले. यावेळी जखमी अनुजकुमार यांनी तात्काळ त्याच्या जवळील वॉकीटॉकीने आरपीएफ कंट्रोलला माहिती दिल्यावरून तात्काळ आरपीएफ निरीक्षक, आरपीएफ जयान यांनी मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेत असलेल्या अनुजकुमार यांना तात्काळ ट्रामा केअर सेंटरला भरतीसाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर डॉ. उमेश मुकुंद व डॉ. संकेत तळेले यांनी उपचार केले. त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. गुरूवारी सकाळी जखमी अनुजकुमार यांना रेल्वे हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.



आयुक्तांनी घेतली जखमीची भेट
रेल्वे सुरक्षा बलाचे वरीष्ठ आयुक्त एच. श्रीनिवास राव, सहायक आयुक्त बी.पी. कुशवाह यांनी रेल्वे हॉस्पीटलमध्ये जात जखमी अनुजकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात जखमी आरपीएफ अनुजकुमार यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणणे आणि आर्म अ‍ॅक्टनुसार दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे हे करीत आहेत. दरम्यान, रात्रीच्या अंधारात चोरट्याचा सिनेस्टाईल पाठलाग करणार्‍या आरपीएफ जवानाच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !