भुसावळ ट्रामा सेंटरमधून 20 हजारांची बॅटरी लांबवली


20,000 battery extended from Bhusawal trauma center भुसावळ : शहरातील ट्रामा सेंटरमधून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबवल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा
ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाच्या परीसेविका शोभा रुपचंद सोनवणे (48) यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी ट्रामा सेंटरची 20 हजार रुपये किंमतीची जुनी वापरती बॅटरी 2 ते 4 जानेवारीदरम्यान केव्हातरी संधी साधून लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सोनवणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय काशीनाथ भोई करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !