भुसावळातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
The thieves stole the bike from Bhusawal भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून शांती नगर भागातील वरद विनायक अपार्टमेंटमधून चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
तक्रारदार गोविंदा श्रीधर पाटील (69, वरदविनायक नगर अपार्टमेंट, प्लॅट क्रमांक 3, भुसावळ) यांच्या मालकिची 15 हजार रुपये किंमतीची अॅक्टीव्हा चोरट्यांनी 27 जानेवारी 2022 ते 3 जानेवारी 2023 दरम्यान चोरट्यांनी केव्हातरी लांबवली. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


