पहूर परीसरातील महिलेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
मध्यरात्रीच्या सुमारास महिलेचा घरात शिरून केला विनयभंग


पहूर : मध्यरात्री घरात झोपलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना पहूर परीसरातील एका गावात घडली. पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री महिलेचा विनयभंग
पहूर परीसरातील एका गावातील महिला नेहमी प्रमाणे झोपली असताना संशयीत राम धनराज चव्हाण याने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पिडीत महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. पिडीत महिलेने दरवाजा उघडून एवढ्या रात्री काय काम आहे?, असे विचारले असता राम चव्हाण याने अश्लिल संभाषण केले. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार प्रशांत विरणारे हे करीत आहेत.
