भुसावळात आमदारांच्या पाठपुराव्यातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी 10 कोटींच्या निधीला मंजुरी


Roads will be laid in ‘Junction’: Success of MLA Sanjay Savkare’s efforts भुसावळ : वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत पालिकांना विशेष अनुदान देण्यात आले. यात भुसावळ पालिकेच्या रस्त्यांच्या 18 कामांसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली आहे. यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामाला गती येणार आहे.

बांधकाम विभागामार्फत होणार कामे
आमदार संजय सावकारे यांनी विशेष अनुदान म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी मंजूर करून आणलेल्या निधीतील कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होणार आहे. प्रत्येक कामासाठी 10 लाख रूपये अथवा त्या पेक्षा जास्त किंमतीस मान्यता देण्यात आली आहे. यात प्रभाग एकमधील ओम कॉलनी रस्ते डांबरीकरणास 50 लाख रूपये, चिंतामणी परिसर रस्ते डांबरीकरणास 30 लाख रूपये, याच प्रभागातील आर.एल पाटील यांचे घण ते रिंगरोड रस्ते दुभाजकासह डांबरीकरणास 50 लाख रूपये, प्रभाग एकमधीलच दत्त मंदीर परिसर, शांती नगर येथे लादीकरणास 20 लाख रूपये, प्रभाग 13 मध्ये गडकरी नगरात रिंगरोड दुभाजकासह रस्ते डांबरीकरणास 1 कोटी, याच प्रभगात भवानी मंदीर, गडकरी नगर परिसरात रस्ते डांबरीकरण करणे 80 लाख रूपये, याच प्रभागात पेंडेरकर यांच्या घरामागे परिसर कॉक्रीटीकरण करणे 20 लाख रूपये, प्रभाग 22 मध्ये देना नगर, लक्ष्मी नारायण नगर, साधान नगर, सुरभी नगर, शेणफडवाडी, कृष्णा नगर, विजू चौधरी यांचे घराजवळ, शिवगंगा चौक ते गणेश पाटील यांच्या घराजवळील रस्ते डांबरीकरणास 1 कोटी रूपये, प्रभाग 22 मध्ये गुरूद्वारा परिसर, भिरूड हॉस्पीटल मागे लादीकरण करण्यास 20 लाख रूपये, प्रभाग 22 मध्ये शिवकॉलनी गोदावरील पार्क, गणराया विहार रस्ते डांबरीकरण करणेसाठी 30 लाख रूपये आणि प्रभाग 24 मध्ये गायत्री नगर, स्वामी समर्थ कॉलनी, साकेत कॉलनी, महेशनगर, श्रीरास हौसिंग सोसायटी परिसर, तुकाराम नगर परिसर, स्वामी नारायण मंदीर परिसर, फुले नगरमधील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी रूपयांची मंजूरी मिळाली आहे. तसेच प्रभाग 24, प्रभाग 20 प्रभाग सात, प्रभाग 6, प्रभाग 10 व प्रभाग 21 मधील रस्त्याच्याकामासाठी आमदार संजय सावकारे यांनी हा 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !