भरधाव दुचाकींमध्ये अपघात : दुचाकीस्वार जखमी
पाळधी : भरधाव दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एक जण जखमी झाला. हॉटेल कर्माजवळ हा अपघात घडला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
30 डिसेंबर 2022 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राहुल अंबादास ठाकूर (35, रा.पाळधी बु.॥, ता.धरणगाव) हे हॉटेल कर्माजवळून आपल्या दुचाकीने जात असताना अज्ञात मोटार सायकलस्वार (नाव गाव माहित नाही) याने रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरदाव वेगात दुचाकी चालवून सुमारास राहुल ठाकूर यांच्या मोटार सायकल (क्र.एम.एच.19 सि. एल. 2890) ला मागील बाजूने धडक दिली. यात राहुल ठाकूर हे पडून जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार उमेश भालेराव हे करीत आहेत.


