मनवेलच्या वृध्दाची आजारास कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या


An old man of Manvel commits suicide by jumping into a well due to illness यावल : तालुक्यातील मनवेल येथील एका 70 वर्षीय वृध्दाने शेत विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शुकवारी उघडकीस आली. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजाराला कंटाळून वृध्दाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

आजारापुढे टेकले हात
मनवेल, ता.यावल येथील योगराज पांडुरंग पाटील (70) हे वृध्द गेल्या काही दिवसांपासुन आजारास कंटाळले होते. या दरम्यानच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होत. गुरूवारी रात्री ते घरातुन बाहेर गेले तर परत आलेचं नाही व शुक्रवारी साकळी शिवारातील एकनाथ चौधरी यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना व मयत यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तर या प्रकरणी नरेंद्र जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !