भुसावळ-मुंबई सेंट्रल नवीन एक्सप्रेस सोमवारपासून धावणार

खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश


Bhusawal-Mumbai Central New Express will run from Monday भुसावळ : भुसावळ जंक्शनवरून मुंबई सेंट्रलसाठी सोमवारपासून नवीन एक्सप्रेस धावणार असल्याने भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दूरचित्रप्रणालीद्वारे या एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवणार आहे. यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी प्रयत्न केले होते.

अनेक वर्षांच्या मागणीला आले यश
भुसावळ ते मुंबईसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील प्रवाश्यांची अनेक दिवसांपासून होती तसेच खासदार रक्षा खडसे यांनी याबाबत रेल्वे मंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांची अनेकदा भेट घेऊन मागणी केली होती, अखेर त्याला यश येऊन सोमवारपासून विशेष ट्रेन सुरू होत आहे. ही विशेष ट्रेन आठवड्यातुन तीन दिवस म्हणजे रविवार, मंगळवार व शुक्रवार संध्याकाळी 5.30 वाजता भुसावळ येथून सुटून मुंबई सेंट्रल येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 5.30 वाजता पोहोचणार असल्याची माहिती यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !