भुसावळात श्रीराम रेणुका माता मंदिरात शाकंभरी नवरात्रीची समाप्ती


भुसावळ : शहरातील श्रीराम रेणुका मंदिरात शाकंभरी नवरात्रीची समाप्ती नुकतीच झाली. . पौष महिण्यातील डिसेंबर पासून शाकंभरी नवरात्र प्रारंभ झाला होता. गेल्या आठ-दहा दिवसापासून मंदिरात रोज शाकंभरी नवरात्रीनिमित्त पूजन केले जात होते.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
यावेळी मंदिरामध्ये रेणुका मातेची मूर्ती सजवण्यात आली होती, तसेच नैवेद्य म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या ठेवण्यात आल्या होत्या.यावेळी आलेल्या भाविकांना पुरोहित प्रशांत जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंदिरातील भाविकांनी देवीच्या गाण्यावर गोंधळ नृत्य जागृती चौधरी, अश्वीनी सरोदे, कविता जोशी, प्रिया जाधव, चेतना कवढे यांनी सादर केले व महाआरती, पूजन झाल्यावर महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला. सूत्रसंचालन जागृती चौधरी तर आभार प्रशांत जोशी यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !