हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही ! : शिवसेना नेते संजय राऊतांचा खळबळजनक दावा
This government will not see the month of February! : Sensational claim of Shiv Sena leader Sanjay Raut नाशिक : शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये खळबळजनक दावा केला असून राज्यपाल लवकरच जातील शिवाय शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असे ते म्हणाले आहे. राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडल्याचे त्यांनी सांगत राजकारण परिवर्तनाच्या दिशेने जात असल्याचे सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौर्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
ते लोक गेल्याने आम्हाला फरक नाही
राज्य घटना व संविधानानुसार सर्वाच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला तर 2024 च्या आधी परीवर्तन होणार तर डॅमेज कंट्रोलसाठी आधी डॅमेज व्हावे लागते. काही लोक सोडून गेली तर आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. राऊत म्हणाले की, शिवसेना एकच आहे. एकच राहील. गट तट हे तात्पुरते आहेत. बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा वटवृक्षाचे बीज रोवले. त्या शिवसेनेचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे करत आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. शिवसेना महावृक्ष आहे. महावृक्षाचा पालापाचोळा पडतो. ते लोक उचलून नेतो. पालापाचोळा जाळून त्यांचा वापर शेकोटीसाठी केला जातो.

तर भेटीमुळे आपल्याला आनंदच !
नारायण राणे यांचे केंद्रीय मंत्रीपद धोक्यात आल्यामुळे ते बेताल आहेत. शिंदे गटातील खासदारांना मंत्रीपद हवे असल्यामुळे तसेच राणे यांची कामगिरी सुमार असल्यामुळे त्यांचे पद जाईल. हिमंत असेल तर राणे यांनी समोरासमोर यावे. उद्धव ठाकरे आणि राणे यांची माझ्यानिमित्ताने भेट होत असेल तर आनंदच आहे, असे राऊत म्हणाले.