फोनवर मिळतेय क्रेडीट कार्डची ऑफर ; फसवणूक होण्यापूर्वीच अमळनेर तालुक्यातील बातमी जरूर वाचा
A young man of Amalner was cheated of seven and a half lakhs by saying that it was a credit card offer जळगाव : क्रेडीट कार्ड देण्याच्या नावाखाली अमळनेर तालुक्यातील मंगरूळच्या तरुणाची तब्बल साडेसात लाख रुपयात फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पर्सनल लोन घेत घातला गंडा
मिलिंद प्रकाश पाटील (23, रा.मंगरुळ, ता. अमळनेर, ह.मु.विठ्ठल महाराज मंदिराजवळ भोयर वाडी, मान, हिंजवडी, पुणे) या तरुणाला 18 ते ते 19 जानेवारीच्या दरम्यान 8535026156 या मोबाईल वरुन एक फोन आला. समोरून बोलणार्या अज्ञात इसमाने पर्सनल लोन व क्रेडिट कार्डच्या ऑफर बाबत सांगून मिलिंद पाटील यांचा विश्वास संपादन केला. यानंतर ओटीपी घेवून त्यांच्या नावावर तब्बल सहा लाख 69 हजार 260 रुपये एवढे पर्सनल लोन घेतले. एवढेच नव्हे अतर लोनची संपूर्ण रक्कम व त्यांच्या बँक खात्यातील 90 हजार 740 रुपये असे एकूण सात लाख 60 हजार रुपये एवढी रक्कम अज्ञात भामट्याने स्वतःच्या ट्रान्सफर करून घेतली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.


