वरणगावातील विविध समस्यांबाबत प्रशासनाला साकडे


भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरातील विविध समस्यांबाबत वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वरणगाव नगरपरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने आरोग्य व नागरी सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली.

विविध समस्या सोडवण्याची अपेक्षा
नगरपालिकेद्वारे रुग्णवाहिका, शववाहिका पेटी उपलब्ध करावी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील पेवर ब्लॉक दुरुस्ती करावी, गावातील हातपंपाची दुरुस्ती करावी, बसस्थानक परीसरातील रीा व इतर वाहनांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी, शहरातील विविध प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांबाबत तत्काळ दखल न घेतल्यास येणार्‍या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, जिल्हा प्रवक्ता वाय.आर.पाटील, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष पप्पू जकातदार, महिला शहराध्यक्ष रंजना पाटील, नगरसेविका रोहिणी जावळे, श्रद्धा गायकवाड, वैशाली सुरळकर, राजेश इंगळे, नरेंद्र इंगळे, योगेश सुरळकर, रीजवान शेख, आशिक शेख, रमाकांत जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !