एन.मुक्टो संघटनेचा इतिहास जाणून घ्या : प्रा.डॉ.युवराज वाणी


भुसावळ : एन.मुक्टो संघटनेच्या अगोदर आपण पुणे विद्यापीठाच्या पुक्टो संघटनेत होतो. 1990 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर 19 जानेवारी 1992 रोजी एन.मुक्टो संघटनेची स्थापन झाली त्या अगोदर जळगाव, धुळे, नंदुरबार तीनही जिल्ह्यांमध्ये प्रवास करून प्राध्यापकांना जोडले आणि आपली संघटना स्थापन करण्यात आली. आपल्याला मिळणारा पगार व पेन्शन जी मिळते आहे याचे सर्व श्रेय संघटनेला आहे त्यामुळे संघटनेचा इतिहास जाणून घ्या, असे स्पष्ट मत प्रा.डॉ.युवराज वाणी यांनी येथे व्यक्त केले. एन.मुक्टो संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ येथील कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या स्थानिक शाखेमार्फत आयोजित वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अधिसभा सदस्य प्रा. एकनाथ गोपाळ नेहेते यांनी संघटनेच्या चालू घडामोडींबद्दल माहिती दिली. त्यात त्यांनी संघटनेच्या बळावर आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर आपले संघटनेचे बहुसंख्येने उमेदवार विजयी केलेले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुनील वसंत पाटील यांनी संघटनेचे महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन सचिव प्रा.डॉ.प्रमोद अहिरे यांनी तर प्रस्ताविक स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राध्यापक आणि प्राध्यापक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी डॉ.जे.एफ.पाटील, डॉ.एस.टी.धूम, प्रा.विलास सोळुंके, डॉ.सचिन येवले, स्थानिक शाखेचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !