खाकीवर हात उचलणार्यांना भर चौकात फटके : पहूर पोलिसांनी गुंड प्रवृत्तींना घडवली जन्माची अद्दल
Those who raise their hands on khaki can be beaten in Bhar Chowk: Pahoor police have created a breeding ground for gangster tendencies. पहूर : कर्तव्यावर खाकीतील कर्मचार्यांनी रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला घ्यावी म्हणून सांगितल्यानंतर दोघांनी पोलीस कर्मचार्यांवरच हात उचलला होता. आरोपी गुन्ह्यानंतर पसार झाले असलेतरी त्यांच्या परभणीतून यंत्रणेने मुसक्या आवळल्या होत्या. गुन्हेगारीचे होत असलेले उदात्तीकरण रोखण्यासाठी शनिवारी पहूर पोलिसांनी गुन्हेगारांची शनिवारी सकाळी 11 वाजता धिंड काढत त्यांना भर चौकात चांगलेच फटकारेही दिले. आरोपींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली तर पोलिसांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड घबराट उडाली.
आरोपींना चार दिवसांची कोठडी
कर्तव्य बजावत असणार्या पोलिस कर्मचार्यांना मारहाण करून गंभीर दुखापत करणार्या दोघा तरुणांना 19 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पहूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने परभणी येथून अटक केली. शनिवार, 0 रोजी दुपारी दोघा संशयीतांना जामनेर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


रस्त्याच्या दुतर्फा जमली गर्दी
14 जानेवारी रोजी पहूर येथील पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे कर्तव्य बजावत असताना पहूर बस स्थानकावर फिरोज शेख सुपडू शेख व त्याचा साथीदार खाजा तडवी यांची रस्त्यावर दुचाकी उभी केल्याने ती बाजूला घे असे बोलल्याचा राग आल्यामुळे दोघांनी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्या डोक्याला व हाताला जबर मारहाण झाल्याने त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. गुन्ह्यानंतर संशयीत अंडरग्राऊंड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत परभणीत त्यांना बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर आरोपींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली.
गुन्हेगारांना भर चौकात फटके
पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर कोकणे यांनी आरोपींना अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक चौकापासून त्यांना फटके मारत पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
