भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचा समारोप
भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन दिवसीय आयोजित स्नेहसंमेलनाचा गुरुवारी संध्याकाळी समारोप झाला. ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी, जवाहर नवोदयचे प्राचार्य आर.आर.खंडारे, जळगाव केंद्रीय विद्यालयाचे प्रिन्सिपल मैथ्यू अब्राहम, सिक्रेट हार्ट चर्चचे फादर आजो, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, प्रिन्सिपल निना कटलर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी उधळले कलागुणांचे रंग
विद्यार्थ्यांनी अनेकता मे एकता कन्सेप्ट, आजादी का अमृत महोत्सव ड्रामा, मनिकर्णिका साँग, मल्हारी साँग, सुदामा कृष्ण मित्रता, युवा का महत्व, कोविड अॅक्ट, पंजाबी साँग, कोळी डान्स, लेझीम डान्स, गोंधळ अशा वेगवेगळ्या 48 गाण्यांवर धम्माल केली. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी 148 विद्यार्थ्यांना पारीतोषिके देण्यात आली. यात कर्नाटक येथे गेलेले इंटरनॅशनल जांभोरीचे विद्यार्थी तसेच दहावीत आलेले टॉपर विद्यार्थी, नॅशनल साठी स्पोर्ट लेव्हलसाठी गेलेले विद्यार्थी, ड्रॉइंग कॉम्पिटिशन व कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन श्रद्धाली घुले, सोफिया पी.बॉडी, कय्यूम शेख, जतीन मोरे यांनी तर आभार प्रिंसीपल निना कटलर यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वर्ग व अन्य शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
