शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट
भुसावळ शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांचा उपक्रम
भुसावळ : शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून भुसावळ शहरातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन, एम.एस.सी.बी.ऑफिस, शहर पोलीस स्टेशन व अन्य ऑफिसमध्ये भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले. संबंधित अधिकार्यांना येत्या 23 जानेवारी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. जयंती साजरी न केल्यास त्यांची रीतसर तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येईल, असे सर्वांना सुचित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, शिवसेना शहरप्रमुख हेमंत खंबायत. विधानसभा संघटक बबलू बर्हाटे, शिक्षक सेनेचे माजी जिल्हाप्रमुख विनोद गायकवाड, उपशहर प्रमुख राकेश खरारे, सोनू ठाकूर, शहर संघटक योगेश बागुल, विभाग प्रमुख पिंटू भोई, शाखाप्रमुख संदीप पाटील, युवा सेना उपशहर प्रमुख चेतन भोई व शिवसैनिक उपस्थित होते.
