पाचोरा तालुक्यातील विवाहितेचा छळ : पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा
Harassment of married couple in Pachora taluka: Crime against husband and in-laws पाचोरा : दहिगाव संत येथील माहेर व कुसुंबा, ता.जळगाव येथील विवाहितेने चारचाकीसाठी माहेरहून दोन लाख रुपये न आणल्याने पतीसह सासू आणि सासर्यांनी छळ केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
विवाहितेच्या तक्रारीअंती गुन्हा
दहिगांव संत, ता.पाचोरा येथील दीपाली जाधव यांचा विवाह कुसुंबा येथील धनराज नामदेव जाधव यांच्याशी 27 एप्रिल 2014 रोजी झाला होता. लग्नानंतर चांगली वागणूक मिळाल्यानंतर किरकोळ कारणावरून दीपाली यांचा शारीरीक व मानसिक छळ सुरू करण्यात आला. दीपाली यांचे पती इस्टेट ब्रोकर असल्याने कामावर जाण्यासाठी व चारचाकी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे, अशी मागणी सासरच्यांनी केली मात्र मागणी पूर्ण न झाल्याने शारीरीक व मानसिक छळ सुरू करण्यात आला. सततच्या त्रासाला कंटाळून दीपाली हिने फिर्याद दिल्यानुसार पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पती धनराज नामदेव जाधव, सासरे नामदेव मोतीराम जाधव व सासुे शांताबाई नामदेव जाधव (सर्व रा.कुसुंबा) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.






