मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात : बोलेरोच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा पाय तुटला
Fatal accident in Muktainagar taluk: A youth on a two-wheeler broke his leg in a collision with a Bolero मुक्ताईनगर : बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोती येथे दर्शनासाठी आलेल्या परप्रांतीय तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर झालेल्या अपघातात दोघे तरुण जखमी झाले तर त्यातील एका तरुणाचा पाय तुटल्याची धक्कादयक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव-सारोळा रस्त्यावर शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. प्राथमिक उपचारानंतर दोघा तरुणांना बर्हाणपूर येथे हलवण्यात आले.
भीषण अपघातात तरुणाचा पायच तुटला
शनिवार, 21 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शिरसाळा येथून श्री मारुती रायाचे दर्शन घेवून बर्हाणपूरकडे मनोज प्रमोद ठाकूर (20) व मोहित गणेश महाजन (19, दोघे रा.रास्तीपुरा, बर्हाणपूर) निघाले असता अज्ञात बोलेरो चारचाकी वाहनाने कट मारल्यानंतर झालेल्या अपघातात मनोज ठाकुर या तरुणाचा पाय तुटून तो गंभीर जखमी झाला तर मोहित महाजनदेखील जखमी झाला. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे हवालदार गणेश मनुरे, धर्मेंद्र ठाकूर यांनी तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका घेवून आरोग्य सेवक प्रदीप काळे, चालक रवी जंगले यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात डॉ.शोएब खान, डॉ.प्रशांत रामवंशी, आरोग्य सेवक प्रदीप काळे, परीसेविका कल्पना नगरे, सुनीता कसबे आदींनी उपचार केले. जखमींना पुढील उपचारार्थ बर्हाणपूर येथे हलवण्यात आले आहे.






