पाचोर्यातील विवाहितेची आत्महत्या : पतीसह तिघांविरोधात गुन्हा
Suicide of married woman in Pachora : Crime against husband and three पाचोरा : शहरातील पुनगाव रोडवरील आशीर्वाद रेसीडेन्सीतील नीलिमा अशोक पाटील या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह सासु व सासर्यांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुटुंबियांनी केला होता घातपाताचा आरोप
शिंदाड, ता.पाचोरा येथील माहेर असलेल्या नीलिमा अशोक पाटील ( 30) यांनी 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता शहरातील राहत्या घरात गळफास घेतला होता. ग्रामीण रुग्णालयात नीलिमा यांचा मृतदेह आणल्यानंतर माहेरच्या मंडळींनी आक्रोश केला. नीलिमा यांना गेल्या दोन वर्षांपासून पती, सासु व सासरे हे शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याचा आरोप नीलिमा यांचा भाऊ दिनेश पाटील यांनी केल्याने शनिवार, 21 जानेवारी रोजी पती अशोक श्रीराम पाटील, सासरे श्रीराम राजाराम पाटील व सासू विजयाबाई श्रीराम पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहेत.






