भुसावळ शहरात 26 रोजी वसंतोत्सवाचे आयोजन
भुसावळ : शहरात वसंत पंचमीचे औचित्य साधून नुपूर कथक डान्स अॅकॅडमीतर्फे वसंतोत्सव या शास्त्रीय कथक नृत्याचा कार्यक्रम शहरातील पुरुषोत्तम नगरातील गायत्री शक्तीपीठात गुरुवार, 26जानेवारी रोजी सायंकाळी
साडेपाच वाजता होणार आहे.


भुसावळकरांना उपस्थितीचे आवाहन
नुपूर कथक डान्स अॅकॅडमीचे विद्यार्थी वसंत ऋतूचे विविध नृत्य सादर करतील. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
