भुसावळात भंगाराच्या गोदामाला आग : सुमारे दोन लाखांचे नुकसान
Fire at a scrap warehouse in Bhusawal: Loss of around two lakhs भुसावळ : शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळील भंगाराच्या गोदामाला मध्यरात्री आग लागल्याने सुमारे दोन लाखांहून अधिक नुकसान झाले. शिवपूर-कन्हाळा रोडवर घोडेपीर बाबा दर्ग्यापासून काही अंतरावर अब्दुल अजीज यांचे भंगाराचे गोदाम असून रविवारी पहाटे अडीच वाजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागली.
शॉर्टसर्किटने आग
पहाटे पालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत भंगार गोदामातील वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत अंदाजे दोन लाखांपेक्षा जास्त रूपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.








