चोपडा तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग : वादानंतर आरोपीने काढली तलवार


molestation of a married woman in Chopra taluka : After an argument, the accused took out a sword चोपडा :तालुक्यातील एका गावातील 28 वर्षीय विवाहितेविषयी बरे-वाईट बोलल्यानंतर त्यास समजावण्यासाठी विवाहितेचा पती गेल्यानंतर आरोपीने तलवार बाहेर काढत दहशत निर्माण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार रविवार, 22 रोजी दुपारी 12.30 वाजता घडला. या प्रकरणी संशयीत आरोपी पवान रोहिदास कोळी (विरवाडे, ता.चोपडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेचा केला विनयभंग
चोपडा तालुक्यातील एका गावातील 28 वर्षीय पीडीतेबाबत संशयत पवान कोळी हा बोलल्याने त्यास समजावण्यासाठी पीडीतेचा पती गेल्यानंतर आरोपीने तलवार बाहेर काढत त्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच पीडीतेचा हात धरत तिला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याने हा प्रकार पाहून पीडीतेची सासू व गल्लीतील लोक जमा झाल्याने आरोपीने त्यांच्यावरही तलवार उगारली. या प्रकरणी आरोपीविरोधात चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र सोनवणे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !