25 हजारांची लाच भोवली : नीमचा ग्रामसेवक जळगाव एसीबीच्या जाळ्यात
25 thousand bribe : Neem’s village servant in Jalgaon ACB’s net जळगाव : नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती 25 हजारांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील (55, रा.सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नाहरकत दाखल्यासाठी मागितली लाच
नीम गावातील 27 वर्षीय तक्रारदार यांचा सुमारे मागील 30 वर्षापासून निम ग्रामपंचायतीच्या हद्दीत वीटभट्टीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे तहसील कार्यालय अमळनेर यांच्या नावे सहा हजार रुपयांची रॉयल्टी भरल्यानंतर आरोपी ग्रामसेवकाने निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर वीटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सागत या दाखल्याच्या मोबदल्यात 17 व 23 जानेवारी रोजी 27 हजार 500 रुपयांची लाच मागितली होती व 25 हजारांत तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. सोमवारी दुपारी निम ग्रामपंचायत कार्यालयात आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.






यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे तसेच एएसआय एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींनी यशस्वी केला.


