गंधमुक्तीच्या कार्यक्रमातून परतणार्या चोपड्यातील शिक्षकासह दोघे अपघातात ठार
Two people, including a teacher from Chopda who were returning from a deodorization program, were killed in an accident चोपडा : नातेवाईकांच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या नातेवाईकांच्या पिकअप बोलेरोने भरधाव ट्रकने उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात चोपडा तालुक्यातील शिक्षकासह दोघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. हा अपघात चोपड्यानजीक रविवारी मध्यरात्री घडला. नितीन दामू मोरे (45, रा.विद्या विहार कॉलनी, चोपडा) आणि गणेश काशिनाथ देशमुख (32, रा, सुंदरगढी चोपडा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
बोलेरोला ट्रकची धडक
गणेश देशमुख, गुड्डू देशमुख, बाबा देशमुख, चुनीलाल देशमुख हे चार जण नाशिक येथे गंधमुक्तीच्या कार्यक्रमासाठी गेले असता गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून ते रविवारी रात्री रेल्वेने जळगावी आले व दुध वाहून नेणार्या गाडीने परतत असतांना अडावदनजीक एका ट्रकने या गाडीला मागून धडक दिल्याने तर गुड्डू अरुण देशमुख (30), बाबा पांडुरंग देशमुख (30), चूनीलाल खुशाल देशमुख (30) हे जखमी झाले आहेत.








