माळेगाव रस्त्यावर अपघात : बर्‍हाणपूरच्या भाविकाचा अखेर मृत्यू


Accident On Malegaon Road : Devotee of Barhanpur finally Died मुक्ताईनगर : बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोती येथे दर्शनासाठी आलेल्या परप्रांतीय तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर झालेल्या अपघातात दोघे तरुण जखमी झाले तर त्यातील एका तरुणाचा पाय तुटल्याची धक्कादयक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव-सारोळा रस्त्यावर शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात जखमी झालेल्या मनोज प्रमोद ठाकूर (27, रास्तीपूरा, वॉर्ड क्रमांक 38, बर्‍हाणपूर) या तरुणाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. अपघात प्रकरणी बोलेरो चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जखमी तरुणाचा अखेर मृत्यू
प्राथमिक उपचारानंतर दोघा तरुणांना बर्हाणपूर येथे हलवण्यात आले. शनिवारी सकाळी 9 वाजता शिरसाळा येथून श्री मारुती रायाचे दर्शन घेवून बर्‍हाणपूरकडे मनोज प्रमोद ठाकूर (20) व मोहित गणेश महाजन (19, दोघे रा.रास्तीपुरा, बर्‍हाणपूर) निघाले असता बोलेरो (एम.एच.19 सी.वाय.2200) ने धडक दिल्याने मनोज ठाकुर या तरुणाचा पाय तुटला होता तर मोहित महाजनदेखील जखमी झाला होता. मुक्ताईनगरात उपचार केल्यानंतर दोघांना बर्‍हाणपूर येथे हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असताना मनोजचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी सोदानसिंग जयसिंग सूर्यवंशी (35, रोशनार, ता.जि.खंडवा) यांच्या फिर्यादीवरून बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संजीव पाटील करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !