अट्टल गुन्हेगाराने दिली दहा घरफोड्यांची कबुली : 14 लाखांचा मुद्देमाल जप्त
A staunch criminal confessed to 10 house burglaries: 14 lakhs of valuables seized सांगली : अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून 10 घरफोड्यांसह 13 दुचाकी गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला. चोरट्यांकडून दुचाकी, दागिन्यांसह 13 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तौफिक सिकंदर जमादार (वय 29, रा. उमळवाड चर्चजवळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे.
13 दुचाकी जप्त
आरोपीने कुंभोज, शिरोळ, निमशिरगाव, औरवाड, हरिपूर, विश्रामबाग येथे दुचाकी चोरल्याची कबुली दिली. शामरावनगर मधील साई कॉलनी व उमळवाड येथे चोरीतील दुचाकी ठेवल्याची माहिती त्याने दिली. पथकाने दोन्ही ठिकाणहून साडेसहा लाखांच्या 13 दुचाकी जप्त केल्या. चौकशी दरम्यान पोळ मळा, मिरजेतील ख्वॉजा वस्ती, शामरावनगर, मिरजेतील साई कॉलनी, विद्यानगर, शंभरफुटी रस्ता, सांगली बसस्थानक, शाहू उद्यान परिसर, गारपीर परिसरातील घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, तांब्याची भांडी असा सात लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत विनायक सुतार, ऋतुराज होळकर, दीपक गायकवाड, नागेश खरात, हेमंत ओमासे, सुनील लोखंडे, कुबेर खोत, चेतन महाजन, संदीप नलवडे, सुनील जाधव, मेघराज रूपनर, नीलेश कदम यांचा सहभाग होता.


