Notorious Mukesh Bhalerao of Bhusawla lodged in Nashik Jail भुसावळातील कुविख्यात मुकेश भालेराव नाशिक कारागृहात स्थानबद्ध

जळगाव जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : नाशिक कारागृहात रवानगी


Notorious Mukesh Bhalerao of Bhusawla lodged in Nashik Jail भुसावळ : पोलीस दप्तरी कुविख्यात म्हणून ख्यातील असलेल्या शहरातील मुकेश प्रकाश भालेराव (28, टेक्नीकल हायस्कूलमागे, ह.मु.भिलवाडीजवळ, यावल नाका, भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी संशयीत भालेराव याच्याविरोधात स्थानबद्धतेचा आदेश सोमवारी काढल्यानंतर आरोपीची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईने भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात आणखी काहींवर अशाच पद्धत्तीने कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संशयीताविरोधात सात गुन्हे दाखल
संशयीत मुकेश भालेरावविरोधात भुसावळ शहर व तालुका पोलिसात खुनाचा प्रयत्न, आत्महत्येचा प्रयत्न, हाणामारीसह आर्मअ‍ॅक्टचे सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढल्याने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांनी 11 जानेवारी 2023 रोजी पोलीस अधीक्षकांकडे स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठवल्यानंतर पडताळणीनंतर तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आल्यानंतर 23 रोजी संशयीताला स्थानबद्ध करण्याचे आदेश पारीत करण्यात आले.







पोलिसांनी केली आदेशाचे अंमलबजावणी
पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे एएसआय युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे, जयंत चौधरी, शहरचे उपनिरीक्षक आसीफ खान युसूफ खान, मोहम्मद वली सैय्यद, अनिल चौधरी, संजय पाटील, सुपडा पाटील, विकास बाविस्कर, भूषण चौधरी आदींनी मकेश भालेराव यास ताब्यात घेत त्याची नाशिक कारागृहात रवानगी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !