भुसावळातील ‘त्या’ फॅक्टरीतून ज्वलनशील पदार्थांचे नमूने तपासणीस रवाना


Samples of inflammable substances from ‘that’ factory in Bhusawal sent for inspection भुसावळ : बायोडिझेल बनवले जात असल्याच्या संशयातून भुसावळ तालुक्यातील खडका एमआयडीसी मधील लक्ष्मी एंटर प्राईजेस या कंपनीतील ज्वलनशील नमूने इंडीयन ऑईलकडून आलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी घेत ते तपासणीसाठी मुंबईच्या लॅबमध्ये पाठवले आहेत. महसूल विभागातर्फे सुध्दा नायब तहसीलदार अंगद आसटकर व पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांनी नमुने घेतले आहेत.

अहवालाअंती ठरणार कारवाईची दिशा
नमून्यांचा अहवाल आल्यानंतर फॅक्टरीत नेमके काय बनवण्यात येत होते याचा निष्कर्ष प्राप्त होणार असून त्यानंतर कारवाईची दिशा ठरणार आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार, प्रकाश वानखेडे, इंडीयन आईलचे अधिकारी राकेश मीणा यांनी त्यांचे पाठविलेले दोन प्रतिनिधी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !