गाडर्‍यातील विवाहितेची आत्महत्या : दोघांना यावल पोलिसांनी केली अटक


Suicide Of married Woman in Car : Two Arrested By Yawal Police यावल : यावल तालुक्यातील गाड्र्‍या येथील 30 वर्षीय विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पती व चुलत दिर विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली. संशयीतांना यावल न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विवाहितेचा अमानूष छळ
तु मला आवडत नाही मी दुसरे लग्न करेल असे सांगत गाडर्‍या या गावातील 30 वर्षीय विवाहिता करसना सुभाष बारेला हिचा पती सुभाष बारेला व चुलत दिर अल्या गुमान बारेला यांनी दोघांनी छळ केला व त्यास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली होती. याबाबतची तक्रार मयताचे वडील नकलसिंग गुटीया मेहता (रा. धुपा, ता.झिरन्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यांनी यावल पोलिसात दिल्यानंतर वरील दोघा आरोपींना अटक करण्यात आली. यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस. बनचरे यांच्या न्यायासनासमोर हजर केल्यानंतर आरोपींना 25 जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !