कस्टमर केअरशी संपर्क साधला अन् साडेतीन लाख गमावून बसला : जळगावातील व्यापार्याची अशीही फसवणूक
A businessman in Jalgaon was cheated online of three and a half lakhs जळगाव : कस्टमर केअरशी कामानिमित्त संपर्क साधणार्या जळगावातील व्यापार्याला ऑनलाईन लिंक पाठवून साडेतीन लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लिंक पाठवून घातला गंडा
तक्रारदार रीझवान अली लियाकत अली सैय्यद (45, नशेमन कॉलनी, जळगाव) यांनी 22 रोजी दुपारी चार वाजता ई कार्ड लॉजेस्टीक कंपनीच्या कस्टमर केअरवर संपर्क साधला असता आरोपीने मोबाईलवर लिंक पाठवली. या लिंकवर क्लीक केल्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून साडेतीन लाखांची रोकड लांबवण्यात आली. तपास हवालदार विजय पाटील करीत आहेत.


