नाहाटा महाविद्यालयाच्या रा.से.यो. विशेष हिवाळी शिबिराचा समारोप


भुसावळ ; ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचालित भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर तालुक्यातील वराडसीम येथील पंडीत नेहरू विद्यालयात आयोजित करण्यात आले. या शिबिराचा समारोप नुकताच झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच बर्‍हाटे होते. समारोपाला पंडित नेहरू विद्यालयाचे चेअरमन सुरेश झारखंडे उपस्थित होते. पंडित नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक सुशीलकुमार खेडकर, डॉ.जी.आर.वाणी यांचीही उपस्थिती होती. व्यासपीठावर कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एस.नाडेकर, डॉ.विलास महिरे, डॉ.ममताबेन पाटील उपस्थित होते.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
प्रास्ताविक प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.ममताबेन पाटील यांनी व आभार डॉ.विलास महिरे यांनी मानले. कॅम्प सिनियर सागर सोनवणे, आदित्य हिवरे, गायत्री बजाज, मयूर फिरके, उमेश पाटील, एकता बजाज, शुभम पाटील, वैभव पाटील, सागर पाटील, जगदीश पाटील, दीपक वाणी, मीनाक्षी झोपे, रोशनी जाधव व इतर स्वयंसेवक उपस्थित होते. प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्हि.पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए.डी. गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.ई.भंगाळे यांच्या मार्गदर्शनातून शिबिर पार पडले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !