भुसावळात जिल्हा सिनियर सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धा


भुसावळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोतसवानिमित्त जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय व सेंट अलॉयसीस स्कूलच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी जिल्हास्तर सॉफ्टबॉल (मुले/मुली) निवड चाचणी स्पर्धा सेंट अलॉयसीस स्कूलमध्ये झाली. प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रिन्सिपॉल सिस्टर सेलमा यांनी खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, मेघश्याम शिंदे, विजय संकत, पराग पाटील, सचिन चौधरी उपस्थित होते.

78 खेळाडूंचा सहभाग
भोळे कॉलेज, नाहाटा कॉलेज, डॉ.उल्हास पाटील ज्युनियर कॉलेज, ताप्ती स्कूल, सेंट अलॉयसीस स्कूल, भुसावळ तसेच पारोळा, जळगाव, चाळीसगाव येथील 78 खेळाडूंनी सहभाग घेतला. यातून निवड झालेले खेळाडू हे महाराष्ट्र राज्यस्तरीय सिनियर सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा (मुले व मुली) औरंगाबाद येथे 27 ते 29 जानेवारी दरम्यान प्रतिनिधीत्व करणार आहेत. निवड समिती सदस्य म्हणून राष्ट्रीय व विद्यापीठ खेळाडू सचिन चौधरी, पराग पाटील व मेघश्याम शिंदे काम पाहिले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !