मुक्ताईनगरातील अपघात बेपर्वा एस.टी.चालकामुळेच ! : डंपर मालकाच्या तक्रारीअंती गुन्हा दाखल


Bhardhav Dumper in Muktinagar hit ST Bus : 10 passengers injured मुक्ताईनगर : एस.टी.महामंडळाच्या भरधाव बसने समोरून येणार्‍या डंपरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपलक चालकासह एस.टी.चालक, वाहकासह दहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाजवळ घडला. या प्रकरणी डंपर मालकाच्या तक्रारीवरून एस.टी.बस चालक नरेंद्र जगन्नाथ देशमुख (वरणगाव) विरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बेपर्वा एस.टी.चालकाविरोधात गुन्हा
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाजवळ बुधवारी चोपडा आगाराच्या भरधाव बस (एम.एच.13 सी.यू.6931) ने समोरून आलेल्या डंपर (एम.एच.19 सी.वाय.5275) ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपर चालक सुनील बाबूलाल काजदेकर (उमापूर, ता.जळगाव), एस.टी.बस चालक नरेंद्र जगन्नाथ देशमुख (रा. वरणगाव), कंडक्टर प्रीतीमा शांताराम अहिरे (रा.भुसावळ) यांच्यासह सुनील बाबूराव काजनेकर (उमापूर), बाबूराव दामोदर ठोसर व यमुनाबाई बाबूराव ठोसर (रा.चिंचखेडा बुद्रुक), गणेश रामकृष्ण कोळी (रा.पारंबी), ईस्माईल खॉ इम्रान खॉ, सुधाकर नारायण अहुळकार, निवृत्ती सापुर्डा ढोण व शुभांगी तुषार अहुळकार (तिन्ही रा.पारंबी) आदी जखमी झाले तर अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर एस.टी.प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत असून बेपर्वाईने एस.टी.प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्‍या चालकांवरही कारवाईची मागणी केली जात आहे तर वेगमर्यादेचे नियंत्रण पाळण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.







एस.टी.चालकाविरोधात गुन्हा
अपघात प्रकरणी डंपर मालक भागवत गजानन तायडे (27, पिंपपळगाव काळे, ता.जळगाव) यांच्या तक्रारीनुसार बस चालक नरेंद्र देशमुख (वरणगाव) विरोधात मुक्ताईनगर पोलिसात भादंवि 279, 337, 338, 427, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विनोद सोनवणे करीत आहेत.

ग्रामस्थांनी घेतली धाव
अपघाताची माहिती मिळताच परीसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, कुर्‍हा शहर प्रमुख पंकज पांडव, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सतीश नागरे, दिलीप भोलाणकर, अविनाश वाढे, ज्ञानेश्वर तायडे, शेख अकबर, विष्णू तायडे यांनी जखमींना उपचारार्थ हलवण्यात मदत केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !