भुसावळातील प.क. कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ येथे मतदार दिन


भुसावळ : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे बुधवार, 25 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.

मतदार दिनानिमित्त सर्वांनी घेतली प्रतिज्ञा
याप्रसंगी सकाळी 11 वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात उपप्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील यांच्या उपस्थितीत सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांनी मतदार दिनानिमित्त मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. जान्हवी तळेगावकर यांनी मतदार दिनाचे महत्त्व सांगितले. सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. शरद अग्रवाल यांनी उपस्थितांना मतदार दिनाची प्रतिज्ञा दिली. प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील, वाय.डी.दिसले यांचे मार्गदर्शन लाभले. नीता चोरडिया, रासेयो स्वयंसेविका यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !