भुसावळातील भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बुधवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त शपथ ग्रहण केली. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर यांनी उपस्थितांना शपथ दिली. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागातर्फे करण्यात आले होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
म प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, प्रा.ए.आर.सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.दयाधन एस.राणे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.ए.जी.नेमाडे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.दीपक जैस्वार, प्रा.तबतेज खान, प्रा.आशिष महाजन, प्रा.के.व्ही.धांडे, बी.एल.ओ.मुरलिधर बाविस्कर, सुनील शेकोकारे, प्रकाश सावळे, राजेश पाटील, दीपक महाजन, विजय पाटील आदींसह सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.








