बोदवड शहरातील प्राथमिक विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम
बोदवड : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित बालसंस्कार केंद्र व श्री गौरीशंकरजी गंगारामजी अग्रवाल प्राथमिक विद्यामंदिराच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मंगलसिंग पाटील होते. आर.टी.बडगुजर, ज्ञानेश्वर चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला बालसंस्कार केंद्रामधील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.
विद्यार्थ्यांनी केली कलागुणांची उधळण
श्री गौरीशंकरजी गंगारामजी अग्रवाल प्राथमिक विद्यामंदिर या विभागातील विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटक, वेशभूषा, गीत गायन, लावणी, विनोदी एकांकिका, सामूहिक नृत्य, समाज प्रबोधनपर कार्यक्रम सादर केलेत. सूत्रसंचालन सुनील मौर्य, ज्योती धनगर, तृप्ती गर्गे व सुरेखा घुले यांनी केले. आभार संतोष रेशवाल यांनी मानले. सर्व विभागातील विद्यार्थी, शिक्षक शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.








