मोहाडीत शिवारात पाणी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडल्याने मृत्यू


A woman who went to fetch water in Shiwar in Mohadi died after falling into a well जामनेर : मोहाडी येथील महिलेचा पाणी घेण्यासाठी विहिरीवर गेल्यानंतर पाय घसरल्याने विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 24 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सरला योगेश राजपूत (30, मोहाडी, ता.जामनेर जि. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

पाणी काढताना तोल जावून पडल्याने मृत्यू
जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे सरला राजपूत या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला होत्या. शेतातील काम करून आपला ते उदरनिर्वाह करीत होत्या. मंगळवार, 24 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या शेतात तूर काढण्याचे काम सुरू होते. शेतात काम करणार्‍या महिला कामगारांना पाणी घेण्यासाठी त्या विहिरीजवळ गेल्या असताना पाणी काढत असतांना त्यांचा पाय घसरल्याने त्या विहिरीत पडला व बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. उशिरापर्यंत महिला पाणी घेऊन आल्या नाही म्हणून महिला कामगार विहिरीत जवळ आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. महिलांनी आरडाओरड केल्याने परीसरातील शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली चांदा यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !