भुसावळातील कोटेचा विद्यालयात 27 व 28 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन
भुसावळ : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात 27 ते 28 जानेवारी 2023 दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन ‘स्पंदन 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.
स्नेहसंमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन
विविध स्पर्धा, मैदानी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. युवा व्याख्याते, समाज प्रबोधनकार वसंत हंकारे मार्गदर्शन करतील. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व भुसावळ नगरपरीषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची उपस्थिती असेल. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी, माजी विद्यार्थिनी यांनी स्नेहसंमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्षा पद्मा मोतीलाल कोटेचा, संस्थेचे सचिव संजय सुराणा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील, उपप्राचार्य प्रा.वाय.डी.देसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक प्रा.डॉ.सरोज शुक्ला, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.हेमंत पी.नारखेडे, प्रा.वसंत खरे, स्नेहसंमेलन सचिव प्रणिता भालेराव व श्रावणी चौधरी यांनी केले आहे.








