यावल शेत शिवारातून 50 हजार रुपये किंमतीचे विद्युत तार लांबवले


Electric wires costing 50 thousand rupees were extended from Yaval Shet Shiwar यावल : यावल शहरालगत शेत शिवारातून एका शेतातून सात खांबावरील राज्य विद्युत वितर कंपनीचे तार अज्ञात चोरट्याने चोरी केले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द यावल पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे तार 50 हजार रूपये किंमतीचे असल्याचे सांगण्यात आले.

चोरट्यांचा मोर्चा शेत-शिवाराकडे
यावल शेत शिवारात प्रदीप रमेश भोळे (चितोडा) यांचे शेत असून त्यांच्या शेतात राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र आहे व त्या रोहित्रावरून शेतकर्‍यांना वीज कनेक्शन देण्याकरीता ठिक-ठिकाणी सात खांबाव्दारे विद्युत तार टाकून कनेक्शन देण्यात आले आहे. या सर्व सात खांबांवरील 50 हजार रूपये किंमतीचे तार कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निर्दशनास आले तेव्हा शेतकर्‍यांनी तातडीने विद्युत वितरण कंपनीला माहिती दिली व घटनास्थळी पाहणी करून वीज वितरणचे वरीष्ठ तंत्रज्ञ हरीश पंडित निंबाळकर यांनी यावल पोलीस स्टेशन गाठले व यावल पोलिसात हरिश निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध 50 हजार रुपये किमतीचे विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करित आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !