यावलच्या विवाहितेचा दीड लाखांसाठी छळ : आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल


Harassment of Yaval’s wife for 1.5 lakh: Case registered against eight persons यावल : शहरातील अक्सानगरातील माहेर असलेल्या 35 वर्षीय विवाहितेने पतीसाठी रीक्षा घेण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये आणावे म्हणून पतीसह आठ जणांनी छळ केला व तिला माहेरी टाकून सोडले. विवाहितेने दिलेल्या फिर्यादी वरून यावल पोलीस ठाण्यात आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
यावल शहरातील अक्सानगरातील माहेर असलेल्या नरगीच बानू अख्तर मेमन (35) यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह 2007 मध्ये अख्तर अल्लाहरखा मेमन (रा. उदना, सुरत, गुजरात) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर सुमारे एक वर्षानंतर पती अख्तर मेमन सह मुक्ताक अल्हाहरखा मेमन, मुक्तार अल्लाहरखा मेमन, आयेशा मुक्तार मेमन, यास्मिन कलीम सय्यद, सलमा युसुफ मेमन, युसुफ मेमन व रेश्मा युसुफ मेमन या सर्व रा. उदना जिल्हा सुरत गुजरात या आठ जणांनी तिचा माहेरहून पतीला रिक्षा घेण्याकरीता दिड लाख रूपये आणावे म्हणुन छळ केला व पैसे दिले नाही म्हणून तिला माहेरी सोडून दिले. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !