भुसावळातून पुन्हा चोरट्यांनी 70 हजारांची दुचाकी लांबवली


Thieves again stole a bike worth 70,000 from Bhusawal भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र थांबायला तयार नाही. एमआयडीसी भागातून चोरट्यांनी 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
तक्रारदार रोहित भैय्यालाल परदेशी (एमआयडीसी, कैलास चीप्समागे, भुसावळ) हे धोबीकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे कामासाठी दुचाकी (एम.एच.19 ई.बी.4869) असून ती त्यांनी घराबाहेर लावल्याची संधी चोरट्यांनी 23 ते 24 दरम्यान साधली. ही बाब मंगळवारी उघडकीस आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !