निष्काळजीपणाने केलेल्या गर्भपातानंतर विवाहितेचा मृत्यू : एरंडोलमधील महिला डॉक्टरांना सक्षम कारावास


Death of wife after negligent abortion : Competent imprisonment of female doctor in Erandol जळगाव : एरंडोल शहरातील महिला डॉक्टरांना महिलेच्या निष्काळीपणाने गर्भपात केल्यानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणी सक्षम कारावासाची शिक्षा जळगाव न्यायालयाने सुनावली. एरंडोल तालुक्यातील तोडी गावातील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एरंडोल शहरातील डॉ.सुरेखा शामलाल तोतला (रा. मारवाडी गल्ली एरंडोल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बुधवार, 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने डॉ.तोतला यांना पाच वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली.

निष्काळजीपणाने केला गर्भपात
एरंडोल येथील डॉक्टर सुरेखा तोतला यांच्याडे गर्भपात करण्याचा परवाना नसतांना त्यांनी कुसूमबाई बाळासाहेब मराठे (रा. तोडी, रा.एरंडोल) यांचा निष्काळजीपणे गर्भपात केला होता. गर्भपात करतांना रक्तस्त्राव झाल्याने महिलेलचा मृत्यू झाल्याची घटना 22 जून 2012 रोजी घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मोहन गणेश बनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन डॉ. सुरेखा तोतला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर, न्या. डी. एस. देशपांडे व जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आला.







सरकार पक्षाकडून प्रभावी युक्तीवाद
सरकारपक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद केला. या खटल्यात डॉ. संग्राम पाटील, आत्माराम मराठे, अशोक काकडे, तत्कालीन तहसीलदार इंदिरा चौधरी, मयताची जेठानी कल्पनाबाई पाटील, पती बाळासाहेब पाटील, शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांच्यासह तपासधिकार्यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. बुधवार,25 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता न्यायालयाने युक्तीवाद व साक्षीदारांच्या साक्षी व पुराव्यांवरुन डॉ. तोतला यांना दोषी ठरवित त्यांना पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !