जबरी लूट प्रकरणातील पसार आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Pasar accused in forced loot case in MIDC police net जळगाव : एक लाख 15 हजारांच्या रोकडसह मोबाईल व टॅबलेट लूट प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी एक वर्षानंतर अटक करण्यात मआयडीसी पोलिसांना यश आले आहे. सागर आकाश दहेकर (19, कंजरवाडा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
वर्षभरानंतर आरोपी जाळ्यात
सुनील शेषराव पाढाळे (रा.सहयोगनगर, हिवरखेडा रोड, जामनेर, जि.जळगाव) हा तरुण 22 मार्च 2022 रोजी वराड ते विटनेर रस्त्याने जात असतांना त्याच्या ताब्यातील एक लाख 14 हजार 629 रुपये रोख, मोबाईल टॅब आणि मोबाईल असा ऐवज हिसकावून घेण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून सागर आकाश दहेकर हा पसार होता. आरोपी जळगाव शहरातील जाखनी नगर भागात आल्याची एमआयीडीसी पोलिसांना कळताच पथकाने आरोपीला अटक केली.








