पैसे देण्यास नकार दिल्याने भुसावळात एकावर चाकूहल्ला
One was stabbed in Bhusawal for refusing to pay भुसावळ : गावाला जाण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून शहरातील तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोन संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
भुसावळ शहरातील काझी प्लॉट, संजय किराणा दुकान जवळ गुरुवारी दुपारी 1.40 वाजेच्या सुमारास गौसिया नगर भागातील अप्या पूर्ण नाव माहीत नाही, फरदिन पूर्ण नाव माहीत नाही या संशयीतांनी तक्रारदार शेख रीजवान मशेख आरीम (18, पापा नगर) यास गावाला जाण्यासाठी पैसे मागितले मात्र तरुणाने ते न दिल्याने संशयीतांनी शिविगाळ करून चापटांनी मारहाण केली तर फरदिन याने मागून येऊन दोघे हात पकडून पँटच्या खिश्यातील चाकूने डाव्या मांडीवर सपासप वार केले. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहे.








