भुसावळात 29 रोजी सकल लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परीचय मेळावा
On 29th at Bhusawal, Sakal Lewa Patidar community will have a bride-groom introduction meeting भुसावळ : अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व लेवा पाटीदार मित्र मंडळ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजाचे भव्य वधूवर परीचय मेळावा रविवार, 29 जानेवारी रोजी भुसावळ शहरातील संतोषी माता बहुउद्देशिय सभागृहात होत आहे. यावेळी वधू-वरांच्या शैक्षणिक व कौटुंबिक माहिती असलेल्या परीचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यांची मेळाव्यास राहणार उपस्थिती
अध्यक्षस्थानी कुटुंब नायक रमेश पाटील असतील. प्रमुख अतिथी माजी महसूलमंत्री आमदार एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे, आमदार शिरीष चौधरी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास युवक-युवतींनी व समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहराध्यक्ष देवेंद्र वाणी व परीचय समिती सदस्य शाम भारंबे, रुपेश चौधरी, शुभम पाटील यांनी केलेले आहे.








