लग्न सोहळ्यातून साडेतीन लाखांचे दागिने चोरीला : जळगावातील प्रकार
Jewels worth three and a half lakhs stolen from wedding ceremony : Type in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅरेडाईजमध्ये आयोजित विवाह सोहळ्यातून दाम्पत्याची नजर चुकवत भामट्यांनी तीन लाख 54 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संधी साधून लांबवला ऐवजा
जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅरेडाईज या लॉनवर 26 जानेवारी रोजी रात्री विवाह सोहळ्यासाठी तक्रारदार मनोज विक्रम कोळी (एसबीआयब महाबळ शाखेजवळ, जळगाव) हे सपत्नीक हजर होते. लॉनवरील स्टेजवर दोघे पती पत्नी हजर असतांना त्यांच्या ताब्यातील दिड लाख रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, 1 लाख 20 हजार रुपये रोख, 84 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच पाचशे रुपये किंमतीची पर्स असा एकूण तीन लाख 54 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबविला. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाठक करीत आहेत.








