गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक : चाळीसगावनजीक वाहन जाळले

12 गोवंशाची सुटका : वाहन चालकाविरोधात चाळीसगाव पोलिसात गुन्हा


Transport of cattle for slaughter purpose: Vehicle burnt near Chalisgaon चाळीसगाव : तालुक्यातील खडकी गावाजवळ गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवल्याची घटना गुरुवार, 26 रोजी रात्री नऊ वाजता घडली. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जमावाने रस्त्यावर पाळत ठेवून वाहन अडविले
नांदगाव येथून चाळीसगावकडे जाणारी मिनीट्रक (क्र.एम.एच.15 सी.के 5740) मधून गोवशांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती नागरीकांना मिळताच त्यांनी गुरुवारी रात्री हॉटेल शिवसागर समोरील नांदगाव-ाळीसगाव रस्त्यावर वाहन अडवले व संतप्त जमाव पाहून चालकाने पळ काढला तर जमावाने या वाहनातील 12 गोवंशाची सुटका करीत वाहनाला आग लावून दिली. या प्रकरणी पोलीस नाईक राहुल भीमराव सोनवणे यांच्या तक्रारीवरून वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला तर गायींची बेलदारवाडीच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली. तपास किशोर सोनवणे करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !