फैजपूरातील प्रवाशाच्या खिशातून 32 हजाराची रोकड लांबवली : यावल बसस्थानकातील घटना
32,000 cash stolen from the pocket of a passenger in Faizpur : incident at Yawal bus stand यावल : यावल बस स्थानकावरून प्रवास करत असतांना एका 35 वर्षीय तरुणांच्या खिशातून भामट्याने 32 हजाराची रोकड लांबवली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
यावल येथील बस स्थानकावरून फैजपूर जाण्यासाठी अय्युब खान जमशेर खान (35, रा.तहा नगर, फैजपूर) हे बसद्वारे फैजपूर येथे जात असताना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते बसमध्ये बसत असतांना गर्दीत कुणीतरी अज्ञात भामट्याने त्यांच्या खिशातील 32 हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आला व त्यांनी तातडीने याबाबत एसटी आगाराला माहिती दिली व यावल पोलीस ठाणे गाठले. यावल पोलीस ठाण्यात अय्युब खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळे करीत आहे.








